ठाकरे शिवसेनेच्या वतीने हिंदी भाषेची सक्ती करण्याऱ्या महाराष्ट्र सरकारच्या शासन निर्णयाच्या जीआरची रत्नागिरीत होळी.

शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख मा.श्री उध्दवसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने शालेय शिक्षण विभागाने इयत्ता पहिली पासून हिंदी भाषेची सक्ती करण्याऱ्या महाराष्ट्र सरकारच्या शासन निर्णयाची (जीआर) होळी आज रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालय, जयस्तंभ समोर रत्नागिरी येथे शिवसेना उपनेते श्री सुरेंद्रनाथ उर्फ बाळासाहेब माने व माजी राज्यमंत्री श्री रविंद्रजी माने यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली. त्यावेळी उपस्थित रत्नागिरी जिल्हा संपर्कप्रमुख श्री सहदेवजी बेटकर, जिल्हाप्रमुख श्री दत्ताजी कदम, जिल्हा समन्वयक तथा उपजिल्हाप्रमुख श्री रविंद्रजी डोळस, संजय पुनसकर, जिल्हा संघटक श्री संतोषजी थेराडे, लोकसभा महिला संपर्कसंघटक सौ.नेहाताई माने, जिल्हा महिला संघटक सौ.वेदाताई फडके, विधानसभा क्षेत्रप्रमुख श्री प्रमोदजी शेरे, राजापूर विधानसभा क्षेत्र संघटक श्री रामचंद्र उर्फ तात्या सरवणकर, महिला विधानसभा क्षेत्र संघटक सौ.सायली पवार, रत्नागिरी तालुकाप्रमुख श्री शेखर घोसाळे, राजापूर तालुकाप्रमुख श्री कमलाकर कदम, लांजा तालुकाप्रमुख श्री सुरेश करंबेळे, संगमेश्वर तालुकाप्रमुख श्री नंददिप उर्फ बंड्या बोरुकर, चिपळूण तालुकाप्रमुख श्री बळीराम गुजर, शहरप्रमुख श्री प्रशांत साळुंखे, लांजा शहरप्रमुख श्री मोहन तोडकरी, महिला तालुका संघटक सौ.पूर्वा मुळ्ये, युवासेना उपजिल्हा अधिकारी श्री संतोष हातणकर, संगमेश्वर युवासेना तालुका अधिकारी श्री तेजस शिंदे, मा.नगरसेविका सौ.रशिदा गोदड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी, महिला आघाडी, युवासेना पदाधिकी, उपतालुकाप्रमुख, उपशहरप्रमुख, विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, शाखाप्रमुख, आजी माजी पदाधिकारी व मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button