चिपळूणशहरातील गोवाळकोट रोड परिसरातील हायलाईफ इमारतीतील फ्लॅटमध्ये किचनमध्ये एक बंदुकीची गोळी खिडकीची काच फोडून आत.

चिपळूण शहरातील गोवाळकोट रोड परिसरातील हायलाईफ बिल्डिंगमध्ये एक धक्कादायक घटना घडली या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर अश्रफ तांबे यांचा फ्लॅट आहे आज सकाळी भर दिवसा अशरफ तांबे यांच्या किचनमध्ये अचानक एक बंदुकीची गोळी खिडकीची काच फोडून आत शिरली. सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळेपरिसरातील नागरिकांमध्ये कमालीची घबराट पसरली आहे. तांबे यांच्या फ्लॅटमधील किचनच्या खिडकीला गोळीमुळे छिद्र पडले होते आणि छऱ्याची गोळी खाली पडलेली दिसली. या घटनेची माहिती तात्काळ चिपळूण पोलीस ठाण्यात देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थितीची पाहणी केली.अशरफ तांबे यांच्या घराशेजारील शेतातून शिकारीच्या उद्देशाने ही गोळी झाडण्यात आली असावी, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button