
उद्योजक सदानंद उर्फ आप्पा कदम यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली.
कोकणातील प्रगतशील शेतकरी आणि उद्योजक सदानंद उर्फ आप्पा कदम यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली.आप्पा कदम हे उद्योजक असून शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांचे सख्खे धाकटे भाऊ आहेत. ते ऐन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे यांना भेटल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
कोकणात आधुनिक शेतीत आपले स्वतंत्र स्थान निर्माण करणारे आप्पा कदम यांनी आपल्या सुपुत्र अनिकेत कदम आणि मित्रपरिवारासह उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीवेळी उद्योजक नितीन केणी, शंकर नायर, मंगेश कदम, रामदास मुरकुटे, किशोर शिर्के आणि अशोक शिंदे हे देखील उपस्थित होते.