अमरावतीच्या सहायक पोलीस उपनिरीक्ष हत्या प्रकरणातील तीन आरोपींना बेड्या


अमरावती शहरातील सहायक पोलीस उपनिरीक्षक (ASI) अब्दुल कलाम हत्या प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. एएसआय कलाम हत्या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या युनिट 2 ने तीन आरोपींना ताब्यात घेतलंय.फाजील खान साबीर खान, जियान उद्दीन ऐसान उद्दीन (वय 22) आणि आवेज खान अयुब खान (वय 22) असे या आरोपींची नावे असून त्यांना अमरावती पोलिसांकडून आता अटक करण्यात आली आहे.

तर फाजील खान साबीर खान याला ख्वाजानगरमधून जखमी अवस्थेत ताब्यात घेतले असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. त्याचा डावा पाय अपघातात फॅक्चर झाला असल्याची माहिती ही समोर आली आहे. मात्र एएसआय अब्दुल कलाम यांची हत्या नेमकी का आणि कोणत्या कारणातून करण्यात आली हे अद्याप कळू शकलेलं नाही. परिणामी पोलीस आता त्या दिशेने ही कसून चौकशी करत आहेत.अमरावतीतील सहायक पोलीस उपनिरीक्षक अब्दुल कलाम अब्दुल कादर असं हत्या करण्यात आलेल्या पोलीस अधिकाऱ्याचं नाव आहे. कलाम यांच्या टू व्हिलरला आरोपीने आधी फोर व्हिलरने धडक दिली. त्यानंतर त्यांच्या पोटावर आणि छातीवर धारधार शस्त्राने सपासप वार करण्यात आले. घटना घडल्यानंतर हल्लेखोर फाजील खान घटनास्थळावरुन पसार झाला होता. या घटनेनंतर संपूर्ण पोलीस विभागसह अमरावती शहरात एकच खळबळ उडाली होती

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button