हिंदी सक्तीच्या निर्णयाची ठाकरे शिवसेनेकडून होळी.

रत्नागिरी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने उद्या (२९ जून) दुपारी ३ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयसमोर इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषेची सक्ती करणाऱ्या शासन निर्णयाची (जीआर) होळी करण्यात येणार आहे. यासंदर्भात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी २७ जून रोजी व्हीसीद्वारे झालेल्या बैठकीतील राज्यातील प्रत्येक जिल्हाप्रमुख यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे सर्व तालुकाप्रमुख, महिला आघाडी जिल्हा संघटक, तालुका संघटक, युवासेना जिल्हाधिकारी, तालुकाधिकारी, युवतीसेना जिल्हा संघटक, तालुका संघटक, शहरप्रमुख, महिला आघाडी शहर संघटक, युवासेना शहर अधिकारी, युवतीसेना शहर संघटक तसेच पक्षाचे अंगीकृत संघटनांचे जिल्हा व तालुका पदाधिकारी तसेच आजीमाजी जि.प. सदस्य, पं.स. सदस्य, सरपंच, नगरसेवक यांना आदेश दिला आहे.

महाराष्ट्र राज्य सरकारने इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषेची सक्ती करणाचा निर्णय घेतला असून, याला ठाकरे शिवसेनेने विरोध केला आहे. तसेच या शासन निर्णयाची (जीआर) होळी करण्याचे आदेश शिवसैनिकांना दिले आहेत.त्यानुसार रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व तालुकाप्रमुखांनी तालुक्यातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, आजीमाजी लोकप्रतिनिधी तसेच ज्येष्ठ शिवसैनिक यांना घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील होणाऱ्या आंदोलन करीता उपस्थित राहावे, असे आवाहन रत्नागिरीचे (उत्तर) जिल्हाप्रमुख बाळा खेडेकर यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button