मुंबई-गोवा महामार्गावर खेड येथील भोस्ते घाटात डांबर सांडल्याने अपघात.

मुंबई-गोवा महामार्गावर खेड तालुक्यातील भोस्ते घाटात डांबर सांडल्यामुळे रस्ता निसरडा झाला आणि त्यामुळे काही दुचाकीस्वार घसरून अपघातग्रस्त झाल्याची घटना गुरुवार दि. २६ जून रोजी सकाळी ११ वाजता उघडकीस आली. या अपघातामुळे पुन्हा एकदा महामार्गावर सुरू असलेल्या बेपर्वा डांबर वाहतुकीच्या गंभीर स्वरूपावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.प्राप्त माहितीनुसार, महामार्गावरून डांबर घेऊन जाणार्‍या एका ट्रकमधील बॅरलमधून डांबर रस्त्यावर सांडले. यामुळे घाटातील काही भाग चकाकला व निसरडा झाला होता. या ठिकाणी दुचाकीस्वारांचे वाहन नियंत्रण बिघडून ते थेट रस्त्यावर आपटले. या अपघातात काही दुचाकीस्वार किरकोळ जखमी झाले असून त्यांच्या अंगावर व कपड्यांवर डांबर लागल्याचे दिसून आले.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button