चिपळूण तालुक्यातील मुरादपूर येथील त्रिमूर्ती गणेशचित्र शाळेतील गणेशमूर्ती निघाल्या गोवा, अंदमानला.

चिपळूण-मुरादपूर येथील त्रिमूर्ती गणेशचित्र शाळेतील शाडूच्या गणेशमूर्तीना यावर्षी राज्याबाहेर मागणी वाढली असून याचा श्रीगणेशा गोवा व अंदमान येथून झाला आहे. यामध्ये गोव्यासाठी ७२, अंदमानला २, तर मुंबईला ४४ गणेशमूर्ती पाठवण्यात येणार आहेत. या माध्यमातून मूर्तीकार सौरभ महाजन यांच्या कलेला सूर्वदूर मान्यता मिळाली आहे.गेली ४१ वर्षे गणेशचित्र मूर्तीकलेतून आपली आवड जोपासत मुरादपूर येथे गणेशमूर्ती कारखाना चालवणारे अनंत उर्फ राजू महाजन यांची पारंपरिक कला जोपासत त्यांचा मुलगा सौरभ यानेही आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून त्रिमूर्ती गणेशचित्र शाळेचा विस्तार केला. केवळ जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या गणेशमूर्ती पाठवण्यात त्यांचा हातखंडा आहे. ग्राहकांच्या पसंतीनुसार पारंपरिक शाडूच्या व पीओपीच्या मूर्ती ते तयार करतात.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button