चिपळूण तालुक्यातील खांदाट-मोरवणेफाटा येथे विवाहितेची आत्महत्या.

चिपळूण तालुक्यातील खांदाट-मोरवणेफाटा येथे राहणार्‍या विवाहितेने बुधवारी सकाळी ११.३० ते १२ या वेळेत पंख्याला साडीने गळफास घेत आत्महत्या केली. याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.शकुंतला अशोक चव्हाण (२७) असे या विवाहितेचे नाव आहे. बुधवारी घरात कोणीही नसताना तिने गळफास घेतला. हा प्रकार काही वेळाने लक्षात आल्यानंतर तिला एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र येथील वैद्यकीय अधिकार्‍यांनी तिला मृत घोषित केले. तिच्यावर शहरातील रामतीर्थ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button