
अलोरे- कोळकेवाडीतील तरुणाचा मृत्यू.
दारूच्या नशेत शेताच्या बांधावरून पडून जखमी झालेल्या कोळकेवाडी-पठारवाडी येथील तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी बुधवारी अलोरे-शिरगाव पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. गणेश नारायण काजवे (३०) असे त्याचे नाव आहे. तो ६ मार्च रोजी दारूच्या नशेत पडल्याने जखमी झाला होता. त्याच्यावर कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना त्याचा ८ मार्च रोजी मृत्यू झाला.www.konkantoday.com