
अमेरिकेतील नासाला भेट देण्यासाठी जि.प.च्या ३१ विद्यार्थ्यांची निवड.
अंतराळ संशोधनाची गोडी लहानपणीच लागावी, यासाठी जिल्हा परिषदेने राबवलेल्या उपक्रमाला मोठे यश लाभले आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमधील तब्बल २२ विद्यार्थ्यांची निवड थेट अमेरिकेतील नासाला भेट देण्यासाठी झाली आहे. हे विद्यार्थी येत्या ३१ जुलै रोजी अमेरिका गाठणार आहेत.
या अभ्यासदौर्यांतर्गत विद्यार्थ्यांना नॅशनल एरोनॉटिक्स ऍण्ड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशन (नासा) आणि भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) यांच्या कार्यपद्धतीचा प्रत्यक्ष अनुभव घेता येणार आहे. जिल्हा परिषदेने शाळास्तरावर आयोजित केलेल्या निवड चाचणीमधून प्रारंभी ५५ विद्यार्थी निवडले गेले होते. त्यातून २२ विद्यार्थी नासासाठी पात्र ठरले. विशेष म्हणजे सलग तिसर्या वर्षी हा उपक्रम जिल्ह्यात राबवला जात आहे.www.konkantoday.com