
’साफयिस्ट’च्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करा -नवनिर्माण सेनेची मागणी.
कामथे-हरेकरवाडीच्या बाजूने वाहणार्या नदीत टँकरद्वारे काही दिवसांपूर्वी सांडपाणी सोडण्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष संतोष नलावडे यांच्यासह शिष्टमंडळाने साफधिस्ट कंपनीचा घनगाळ (वेस्ट) बाहून नेणार्या नक्षत्र कंपनीवर गुन्हा दाखल करावा, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा पोलिसांना दिला आहे.मनसेने पोलीस ठाण्यात दिलेल्या या निवेदनात म्हटले आहे, साफयिस्ट कंपनीच्या उग्र वासाच्या घनगाळाची विल्हेवाट लावण्याचे काम नक्षत्र कंपनीला देण्यात आले आहे.
ही कंपनी ईस्लामपूर येथील असल्याचे समजते. घनगाळ वाहून नेणे आणि विल्हेवाट लावण्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित कंपनीची (ठेकेदाराची) आहे. मात्र जादा पैसे मिळवण्याच्या हव्यासापोटी घनगाळ भरलेले टँकर कामथे येथील नदीमध्ये खाली करण्यात आले हा टँकर पोलीस स्टेशनमध्ये उभा आहे. साफयिस्ट कंपनीतून सांडपाणी टँकरद्वारे सोडल्यामुळे नैसर्गिक नाल्यात असलेले पाणी दूषित झाले आहे. यामुळे ठेकेदारावर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.www.konkantoday.com