
लांजा तालुक्यातील कोलधे कुंभारवाडी येथे साकव कोसळला.
लांजा तालुक्यातील कोलधे कुंभारवाडी येथे अनिल तांबे दुकान ते कुंभारगावाकडे जाणार्या वहाळावरील मोडकळीस आलेला लोखंडी साकव २५ जून रोजी झालेल्या मुसळधार पावसात झाडाची फांदी पडून कोसळला. सुदैवाने कोणतीही दुर्घटना घडली नसली तरी यामुळे ग्रामस्थांची मोठी गैरसोय झाली आहे. कोलधेतील अनिल तांबे ते. कुंभारगावाकडे जाणारा १५० मीटर लाबीचा वहाळावरील साकव दुरुस्तीच्या प्रतीक्षेत होता. साकवाची दुरवस्था झाली असून त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थ सातत्याने करत होते. मुसळधार पावसामुळे आंबा कलमाची फांदी पडल्याने अखेर २५ जून रोजी सकाळी ११ च्या सुमारास साकव पूर्णपणे मोडून पडला. घटना घडली त्यावेळी साकवाजवळ असणारी व्यक्ती बालंबाल बचावली. साकव कोसळल्याने कुंभार गावाचा कोलधे गावाशी संपर्क तुटला आहे. ग्रामस्थांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने त्याचा फटका अखेर कोलधे ग्रामस्थांना बसला आहे.www.konkantoday.com