माजी आमदार रामदासभाई कदम यांनी घेतली कदम पिता-पुत्रांची भेट घेतल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ.

चिपळूणचे माजी आमदार, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष रमेशभाई कदम येत्या महिनाभरात शिवसेना शिंदे पक्षात प्रवेश करणार असल्याच्या बावड्या उठल्या आहेत. त्यातच आता श्री. कदम यांनी नुकतीच शिवसेना शिंदे पक्षाचे नेते, माजी मंत्री रामदासभाई कदम, राज्याचे गृहराज्यमंत्री ना. योगेशदादा कदम यांचीही जामगे येथे सदिच्छा भेट घेतल्याने राजकीय वतुर्ळात चर्चेला उधाण आले आहे. काही दिवसांपूर्वी पालकमंत्री ना. उदय सामंत एका कार्यक्र मानिमित्त चिपळूण दौर्‍यावर होते. यावेळी त्यांनी भर कार्यक्रमात माजी आमदार रमेशभाई कदम यांच्या राजकीय व सामाजिक कार्याचे भरभरून कौतुक केले होते. तर गाडीत झालेल्या दोघांमधील सविस्तर चर्चेवर उघडपणे भाष्य करतानाच येत्या महिनाभरात त्या चर्चेचे चांगले परिणाम दिसतील, असे सांगत श्री. कदम यांच्या शिवसेना शिंदे पक्ष प्रवेशाचे संकेत दिले होते. त्यानंतर मात्र चिपळूण शहरासह तालुक्यात एकच खळबळ उडाली होती.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button