
नवव्या अखिल भारतीय रोलर स्केटिंग स्पर्धेत रेयांश बनेला तीन सुवर्ण.
नवव्या अखिल भारतीय रोलर स्केटिंग स्पर्धेत महाराष्ट्राचा युवा खेळाडू भांडूपच्या रेयांश पराग बने याने तीन सुवर्ण पदके पटकावली. ही स्पर्धा कोलकात्ता येथे नुकतीच पार पडली. या स्पर्धा रोड लॅप, १०० मीटर रोड, ५०० मीटर रोड अशा तीन टप्प्यात घेण्यात आली. या तिन्ही प्रकारात रेयांश बने याने (८ -१०) वयोगटातून महाराष्ट्राचे नेतृत्व केले. या राष्ट्रीय मानांकन स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघातून रेयांश याची निवड झाली होती. तिन्ही प्रकारात रेयांश बने याने सुवर्णपदकाची हॅट्रीक करून महाराष्ट्राची तसेच भारताची मान उंचावली आहे. रेयांशने आतापर्यंत गोवा, म्हैसूर, केरळ आणि कोलकात्ता येथे चार वेळा महाराष्ट्राचे रोलर स्केटिंगसाठी नेतृत्व केले आहे. रेयांश हा महाराष्ट्रीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाळकृष्ण बने, सचिव माजी आमदार डॉ. सुभाष बने यांचा नातू आहे. युरो स्कूलचा तो विद्यार्थी आहे. वयाच्या पाचव्या वर्षी त्याने महाराष्ट्रातील बेळगाव येथे सतत ९६ तास स्केटिंग करून आपले नाव गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदवले आहे.www.konkantoday.com