छोट्या मुलाचा मृत्यू झाल्यानंतर अखेर ’त्या’ बांधकामाभोवती अखेर पत्रे उभारले.

दापोली उपजिल्हा रुग्णालयाच्या बांधकाम सुरू असणार्‍या लिफ्टच्या टाकीत पडून समीर चव्हाण या पाच वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाल्यानंतर ठेकेदाराने आता या नव्याने सुरू असणार्‍या बांधकामाभोवती पत्रे लावून बंदिस्त केले आहे. मात्र त्याला हे शहाणपण आधी सुचले असते तर समीरचा जीव वाचला असता, अशा प्रतिक्रिया उमटत आहेत. ’तरुण भारत संवाद’ने फादर्स डे निमित्ताने याबाबत रोखठोक लिखाण करत आवाज उठवला होता. शहरातील उपजिल्हा रुग्णालयालगतच याच्या नवीन इमारतीचे बांधकाम सुरू आहे. या नवीन इमारतीच्या लिफ्टसाठीच्या टाकीत बुडून समीरचा मृत्यू झाला.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button