
सावर्डे भागातील दोन कात कारखाने अवैध.
सावर्डे भागातील सचिन कात कारखाना व अन्य एक कारखाना अवैध व परवाना नसल्याचे निष्पन्न झाल्याची बाब आता उघड झाली आहे. यापैकी कातभट्टी व खैर लाकूड संदर्भात काही दिवसांपूर्ची संबंधित विभागांनी छापा टाकला होता.हे प्रकरण उघडकीस येण्यास मुश्ताक अदब तासिया या संशयिताचा खैर तस्करी प्रकरणात प्रमुख भूमिका असल्याच्या धागेदोर्यावर हे कारखाने अवैध असल्याचे उघड ्रझाले.मुश्ताक तासिया या संशयिताचे खैर तस्करी प्रकरणात मुख्य संशयित असून तसेच त्याचे फळाचे दुकान आहे.
मध्यंतरी सुरत (गुजरात) वन विभागाच्या तपास पथकाने संशयितास चौकशीसाठी ताब्यात घेतले. दरम्यान, संशयिताकडून दाखल अटकपूर्व जामीन अर्ज गुजरात उच्च न्यायालयाने फेटाळला. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला व मांडवी कोर्टातहजर करून पुढील कारवाईस आत्मसमर्पण करा, असे आदेश दिले.8 जानेवारी रोजी संशयिताचा ताबा सूरत वन विभागाच्या तपास पथकाला दिला.