
सशस्त्र फोर्सेस मेडिकल सर्व्हिसेस (AFMS) महाविद्यालयात प्रवेशासाठी www.joinindianarmy.nic.in (jia) वेबसाइटवर संपर्क व नोंदणी करा.
रत्नागिरी, दि. 26 : नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) द्वारा चार वर्षांच्या बीएससी (नर्सिंग) कोर्समध्ये प्रवेश घेण्यासाठी नर्सिंग अंतर्गत सशस्त्र फोर्सेस मेडिकल सर्व्हिसेस (AFMS) महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी पात्र असलेल्या NEET (UG) -2025 या महिला उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. याबाबतच्या अधिक माहितीसाठी www.joinindianarmy.nic.in (jia) वेबसाइटवर संपर्क व नोंदणी करा आणि अर्ज करा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांनी केले आहे.
NEET (UG) 2025 स्कोअर, जनरल इंटेलिजेंसची संगणक आधारित चाचणी, सामान्य इंग्रजी (ToGIGE), मानसशास्त्रीय मूल्यांकन आणि मुलाखत, प्रत्येक महाविद्यालयात वैद्यकीय तंदुरुस्ती आणि रिक्त जागा वापरुन उमेदवारांची निवड केली जाईल. एएफएमएस संस्थांमध्ये बीएससी नर्सिंग कोर्समध्ये प्रवेश घेण्याची इच्छा असलेल्या सर्व उमेदवारांसाठी एनटीएद्वारे आयोजित केलेल्या NEET (UG) -2025 पात्रता. स्क्रीनिंग प्रक्रियेसाठी शॉर्टलिस्ट केल्यास बेस हॉस्पिटल, दिल्ली कँट (BHDC) येथे दिलेल्या तारखेला उपस्थित राहणे या बाबी अनिवार्य आहेत. 000