शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रत्नागिरी येथे ०७ वे मरणोत्तर देहदान…

दिनांक – २६/०६/२०२५ रोजी श्रीम. विमल शंकर पेडणेकर, वय – ८५ वर्ष. राहणार – खेडशी नाका , रत्नागिरी यांचे देहदान शासकिय वैद्यकिय महाविद्यालय रत्नागिरी येथे करण्यात आले.

दिनांक – २५/०६/२०२५ रोजी वृद्धापकाळाने श्रीम. विमल शंकर पेडणेकर यांचे शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालय, रत्नागिरी मधील अतिदक्षता विभाग येथे सायंकाळी निधन झाले ,वहोते. त्यांच्या पश्चात त्यांची मुलगी श्रीम. माधवी मधूकर नाखरेकर यांनी शासकीय वैद्यकिय महाविद्यालय रत्नागिरी येथे श्रीम.विमल पेडणेकर यांचे विद्यार्थ्यांना अध्यापनासाठी व संशोधनासाठी देहाचा उपयोग व्हावा म्हणून देहदान केले. यावेळी श्रीम. विमल पेडणेकर यांची नात सौ. मंजिरी नाखरेकर, नात जावई व सुहास पालेकर, सागर भिंगारे , आणि शासकीय रुग्णालयातील स्टाफ यांचे मोलाचे सहकार्य लाभले.श्रीम. विमल शंकर पेडणेकर यांचे देहदान दिनांक २६/०६/२०२५ रोजी शासकीय वैद्यकिय महाविद्यालय रत्नागिरी येथे करण्यात आले.देहदानाच्या या संपूर्ण प्रक्रियेमध्ये शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालय, रत्नागिरी चे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या मार्गदर्शनाखाली शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालय, रत्नागिरी चे वैद्यकीय अधिक्षक डॉ. विनोद सांगवीकर तसेच शरीररचनाशास्त्र विभागप्रमुख डॉ. सादिकअली सय्यद, डॉ. योगिता कांबळे, वैद्यकीय समाजसेवा अधिक्षक श्री. रेशम जाधव, शरीररचनाशास्त्र विभागातील कर्मचारी पूर्वा तोडणकर,भूमी पारकर , मिथिलेश मुरकर , मिहिर लोंढे यांनी काम पाहिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button