
रत्नागिरी जिल्ह्यातील २८ धरणे शंभर टक्के भरली!
रत्नागिरी जिल्ह्यात सध्या पडत असलेल्या मुसळधार ते अतिमुसळधार पावसामुळे जिल्हयातील पाणीटंचाईचा प्रश्न मिटला आहे. जिल्ह्यात असलेल्या ३ मध्यम तर ६५ लघुपाटबंधारे प्रकल्पांमध्ये पाणीसाठ्यात कमालीची बाढ झालेली आहे. सध्या जिल्ह्यातील ६८ धरणांपैकी २८ धरणे १०० टक्के भरली असून २८ धरणे ५० टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा झाल्याचा अहवाल रत्नागिरी पाटबंधारे मंडळाकडून देण्यात आला आहे.मे महिन्याच्या मध्यापासून जिल्हयात सर्वत्र दमदार पाऊस पडल्याने जिल्हयातील धरणांमध्ये खालावलेली पाणीपातळी कमालीची वाढली. त्यामुळे टंचाईग्रस्त गावांनाही त्यातून दिलासा मिळाला आहे.www.konkantoday.com