नागरिकांच्या हरकती लक्षात घेऊन विकास आराखड्यात अत्यावश्यक बदल करणार -आ. किरण सामंत.

कोणाचेही नुकसान न करता नागरिकांच्या हरकती लक्षात घेऊन आणि सर्वांना विश्वासात घेऊनच विकास आराखड्यात अत्यावश्यक बदल केले जातील, असे आश्वासन आमदार किरण सामंत यांनी कुवे ग्रामस्थांना दिले. कुवे येथील डम्पिंग ग्राऊंडची जागेवर जाऊन पाहणी करत मुख्याधिकार्‍यांना १५ दिवसात जागा बदलण्याची सूचना आमदार सामंत यांनी केली.कुवे ग्रामस्थांनी नुकतीच आमदार किरण सामत यांची भेट घेतली यावेळी सामंत यांनी आश्वासन दिले. शहर विकास आराखड्याबाबत समस्या, कुवेतील इंम्पिंग ग्राऊंड व नगर पंचायत कार्यक्षेत्रात मृत्यू दाखल्यासाठी वैद्यकीय अधिकार्‍यांचे आवश्यक असणारी वैद्यकीय प्रमाणपत्र अट रद्द करण्यात यावी, अशा मागणीसंदर्भात सामंत यांची भेट घेत चर्चा केली. यावेळी कुवे ग्रामस्थांनी सामंत यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, कुवेतील महामार्गावर असणारे डम्पिंग ग्राऊंड गेली २ वर्षे सुरू आहे. या डंम्पिंग ग्राऊंडच्या आजूबाजूला लोकवस्ती व लोकांचा मोठ्या प्रमाणात वावर आहे. आम्ही वारंवार मागणी करूनही काही कार्यवाही होत नाही त्यामुळे आपण लक्ष घालून डम्पिंग ग्राऊण्ड त्वरित स्थलांतरित करावे अशी मागणी करण्यात आली आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button