नववीतील विद्यार्थ्याचा आठवीतल्या विद्यार्थ्यांने खून केला, खुनाने अहिल्यानगर हादरले!_____

अहिल्यानगर शहरातील सीताराम सारडा या शाळेत नववीमध्ये शिकत असलेल्या मुलाचा खून करण्यात आल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी तोफखाना पोलिसांनी तपास सुरू केला आहे. रात्री उशिराने यासंदर्भातला गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, पोलिसांनी संबंधित अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. अफान तन्वीर शेख असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे.

या शाळेत आठवीमध्ये शिकणाऱ्या मुलाने नववीतील अफानसोबत मागील कारणावरून हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला. या दोघांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. आठवीमध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन मुलाने त्याच्याकडे असलेल्या चाकूने नववीतील अफानवर वार केले. यात गंभीर जखमी अफानला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केले असता त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button