
*तरुण बेपत्ता
रत्नागिरी, दि. 26 : किरण सखाराम जाधव, वय वर्षे 37, रा. राजीवडा हा दि. 8 जून 2025 रोजी सकाळी 11 वाजता भाट्ये समुद्रकिनारी मुळे काढण्यासाठी गेला तो परत आलेला नाही. नापत्ता झाला आहे. त्याचा रंग सावळा, उंची 5 फुट 5 इंच, डोळे काळे, चेहरा गोल, अंगाने मजबूत, केस –डोक्याला टक्कल असलेले, बारीक कापलेली दाढी, शिक्षण 6 वी, डाव्या हातावर किरण नावाचे गोंदण, गळ्यात काळा दोरा, अंगात हिरव्या व पांढऱ्या रंगाचा पट्टा असेलेला टि शर्ट, नेसणीस चॉकलेटी रंगाची हाप पॅन्ट, पायात चप्पल आहे.
अनिता अजित रजपुत, वय वर्षे 57 या 5 जून 2025 सकाळी 10.30 वाजताच्या दरम्यान घर नं.167, पोमेंडी खुर्द, काजरघाटी या त्यांच्या राहत्या घरातून कोणलाही न सांगता निघून गेल्या व नापत्ता झाल्या आहेत. त्या अशिक्षीत आहेत, उंची 5 फुट,सडपातळ बांधा, रंग सावळा, काळे डोळे, सरळ नाक, केस काळे लांब, अंगात नेसणीस पांढऱ्या रंगाची साडी त्यावर ठिपके असलेली व ब्लाऊज, पैसे अंदाजे 1 हजार 500 रुपये रोख रक्कम, मोबाईल नाही. वरील व्यक्तींबाबत कोणतीही माहिती मिळाली अथवा आढळल्यास शहर पोलीस ठाणे, रत्नागिरी यांच्याशी संपर्क साधावा.000