ऑपरेशन सिंदूर’सह देशाची गोपनीय माहिती पाकिस्तानला दिली, नौदलाच्या कर्मचाऱ्याला अटक, मोबाईल चॅटमधून धक्कादायक खुलासा!

नवी दिल्ली :* ‘ऑपरेशन सिंदूर’सह देशाची गोपनीय माहिती पाकिस्तानला देणाऱ्या नौदलाच्या कर्मचाऱ्याला दिल्लीतून अटक करण्यात आली आहे. राजस्थानच्या गुप्तचर शाखेने ही कारवाई केली आहे. विशाल यादव असे पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या आरोपीचे नाव असून तो दिल्लीतील नौदल भवनमध्ये अपर डिव्हीजन क्लार्क पदावर कार्यरत होता. सोशल मीडियाच्या माध्यमातून विशाल पाकिस्तानची एजंटच्या संपर्कात असल्याचे उघड झाले आहे.

पोलीस महानिरीक्षक विष्णू दास गुप्ता यांनी या कारवाईबाबत माहिती देताना सांगितले की, नौदल भवनमधील अपर डीव्हीजन क्लार्क विशाल यादवला बुधवारी अटक करण्यात आली. ऑफिशियल सिक्रेट्स ऍक्ट 1923 अंतर्गत ही कारवाई करण्यात आली असून तो मूळचा हरयाणातील रेवाडी जिल्ह्यातील पुनसिका येथील रहिवासी आहे.राजस्थान पोलिसांचे गुप्तचर पथक पाकिस्तानच्या हेरगिरी कारवायांवर लक्ष ठेवून होते. नौदल भवन दिल्ली येथील डॉकयार्ड डायरेक्टरेटमध्ये काम करणारा विशाल हा सोशल मीडियाद्वारे पाकिस्तानी गुप्तचर संस्थेतील एका महिला हँडलरच्या संपर्कात होता. प्रिया शर्मा असे टोपण नाव धारण केलेली ही महिला विशालला पैशाचे आमिष दाखवून त्याच्याकडून नौदल भवनातील गोपनीय माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत होती. गोपनीय माहिती पुरवण्याच्या बदल्यात विशालला क्रिप्टोकरन्सीमध्ये मिळत होती, असेही गुप्ता यांनी सांगितले.

विशाल यादव याला ऑनलाईन गेम खेळण्याचे व्यसन होते. आपल्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी त्याने देशाची गोपनीय आणि संवेदनशील माहिती पाकिस्तानातील एका महिला हँडलरला पुरवण्यास सुरुवात केली होती. या बदल्याच्या त्याला क्रिप्टोकरन्सी मिळत होती, अशीही माहिती प्राथमिक तपासात उघड झाली आहे. एवढेच नाही तर त्याच्या मोबाईल चॅटमधूनही काही धक्कादायक खुलासा झाले आहेत.दरम्यान, पोलिसांनी आरोपीचा विशाल मोबाईल जप्त केला असून त्याच्या ताब्यातून काही कागदपत्र हस्तगत करण्यात आली आहेत. विशालने ऑपरेशन सिंदूर मोहिमेदरम्यानही पाकिस्तानी महिलेला नौदलाशी आणि देशाच्या संरक्षणाशी संबंधित गोपनीय माहिती पुरवली होती, असे उघड झाले आहे. सध्या त्याला अटक करण्यात आली असून जयपूरमध्ये त्याची कसून चौकशी सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button