वेरळ येथे ६० हजारांच्या गुटख्यासह ४ लाखांचा मुद्देमाल जप्त


मुंबई-गोवा महामार्गावरील वेरळ येथे खेड पोलिसांनी कारवाई करत गुटख्याची अवैध वाहतूक करणारा एक टेम्पो ताब्यात घेऊन सुमारे ४ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
गुरुवारी महामार्गावर पोलिसांकडून वाहतूक तपासणी सुरू असताना एमएच 10 डीटी 6678 क्रमांकाच्या टेम्पोला थांबवण्याचा प्रयत्न केला असता चालकाने टेम्पो भरधाव वेगाने पळवला.
मात्र, खेड पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक येवले यांनी प्रसंगावधान राखत पाठलाग करून संबंधित टेम्पो अडवला. तपासणीअंती टेम्पोमध्ये १४ पोत्यांमध्ये भरलेला प्रतिबंधित गुटखा आढळून आला.
प्रत्येक पोत्यात २२ पॅकेट असून एकूण ३०८ पॅकेट्स मिळून आले. प्रत्येकी पॅकेटची किंमत १९८ रुपये असून, एकूण गुटख्याची किंमत ६०,९८४ रुपये इतकी आहे.
यासोबतच तस्करीसाठी वापरलेला अशोक लेलँड कंपनीचा ४ लाख रुपये किमतीचा टेम्पोही पोलिसांनी जप्त केला आहे.
सदर कारवाई पोलीस निरीक्षक नितीन भोयर व उपनिरीक्षक येवले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या प्रकरणी अविनाश पारेकर (वय २१, राहणार – जत सांगली ) या तरुणाविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून, अधिक तपास खेड पोलीस ठाणे करत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button