
वाढीव मतदानाच्या आरोपातील हवा निघाली, प्रकाश आंबेडकरांना मोठा धक्का
वाढीव मतदानाच्या आरोपातील हवा निघाली, प्रकाश आंबेडकरांना मोठा धक्का, ही याचिका काल दिवसभर ऐकून आमच्या कामकाजाचा वेळ वाया गेला, असंही हाय कोर्टानं म्हटलं आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी निवडणूक आयोगाच्या विरोधात मुंबई हाय कोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर काल संध्याकाळपर्यंत सुनावणी झाली होती. या याचिकेसंदर्भातील निर्णय आज देण्यासाठी न्यायालयानं राखून ठेवला होता. त्यानंतर आजा मुंबई हाय कोर्टानं यासंदर्भातील निर्णय दिला आहे. मुंबई हाय कोर्टानं प्रकाश आंबेडकर यांनी विधानसभा निवडणुकीत सायंकाळी पाच वाजेनंतर झालेल्या 76 लाख मतदानावर आक्षेप घेऊन, निवडणूक आयोगाविरोधात दाखल केलेली याचिका फेटाळली आहे.
या याचिकेमध्ये काही प्रमुख मागण्या आणि अक्षेप होते, त्यामध्ये संध्याकाळी पाचनंतर जे 76 लाख मतदान वाढलं, त्यामध्ये 19 अशा जागा होत्या, ज्यामध्ये मतदान सर्वाधिक वाढलं होतं. एवढं मतदान अचानक कसं वाढलं, असा प्रश्न त्यांनी आपल्या याचिकेमधून उपस्थित केला होता. प्रकाश आंबेडकर यांच्या या याचिकेवर काल दिवसभर सविस्तर युक्तिवाद झाला. न्यायालयानं या प्रकरणाचा निकाल राखून ठेवला होता. आज न्यायालयानं या संदर्भात निकाल दिला आहे. प्रकाश आंबेडकर यांची याचिका फेटाळून लावण्यात आली आहे.
न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती आरीफ यांच्या खंडपिठानं हा निकाल दिला आहे. न्यायालयानं ही याचिका फेटाळून लावली आहे. काल दिवसभर ही याचिका ऐकून आमच्या कामकाजाचा वेळ वाया गेला असंही न्यायालयानं म्हटलं आहे.
विधानसभा निवडणुकीत पाच वाजेनंतर तब्बल 76 लाख मतदान झालं होतं, या वाढीव मतदानावर आंबेडकर यांनी आक्षेप घेतला होता, या प्रकरणात त्यांनी निवडणूक आयोगाविरोधात हाय कोर्टात याचिका दाखल केली होती. मात्र त्यांची ही याचिका फेटाळण्यात आली आहे.