
काळबादेवी पुलाला काही मोजक्या लोकांकडून विरोध -पालकमंत्री उदय सामंत.
रत्नागिरी नजिकच्या काळबादेवी येथे होणार्या प्रस्तावित पुलाला ग्रामस्थांकडून विरोध असल्याचे सांगण्यात येत आहे. प्रत्यक्षात आपण तीन वेळा ग्रामस्थांसोबत बैठक घेतली आहे. यावेळी ग्रामस्थांनी पूल होण्यासंदर्भात सकारात्मक प्रतिसाद दिला होता. केवळ विरोधासाठी मोजक्याच जणांकडून विरोध केला जात आहे. पुलामुळे रत्नागिरी तालुक्याचा विकास होणारच आहे पण पर्यावरणालाही चालना मिळणार आहे, असे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.पालकमंत्री सामंत यांनी सांगितले की, काळबादेवी येथील जेवढ्या लोकांनी पूल नको म्हणून अर्जावर सह्या केलेल्या आहेत त्याच्यापेक्षा जास्त सह्या ह्या पूल हवाय म्हणून केलेल्या असल्याचेही सांगितले. ग्रामस्थांनी विरोध नसल्याचे सांगून काळबादेवी येथे नकाशामध्ये दाखवल्याप्रमाणे पूल व्हावा असेही सांगितले. याबाबतचे व्हिडिओही व्हायरल झालेले असल्यचे सामंत यांनी सांगितले आहे.www.konkantoday.com