सत्कोंडी व कांबळेलावगण येथील जिल्हा परिषदेच्या मराठी शाळांमध्ये ८ किलो वॅटचा सोलर प्रकल्प कार्यान्वित


महाराष्ट्र फाउंडेशन, अमेरिका यांनी पुरस्कृत केलेल्या पंचम एकात्मिक ग्रामविकास प्रकल्पांतर्गत तालुक्यातील सत्कोंडी व कांबळेलावगण येथील जिल्हा परिषदेच्या मराठी शाळांमध्ये ८ किलो वॅटचा सोलर प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे.या दोन्ही शाळा जिल्ह्यातील पहिल्या सौर शाळा झाल्या आहेत. या शाळांवर तब्बल साडेपाच लाखांचे सौर पॅनल बसविण्यात आले आहे. त्यामुळे दोन्ही शाळांचे वीजबिल शून्य होणार असून, वर्षाला सुमारे दोन लाख रुपयांची बचत होणार आहे.

सत्कोंडीमधील स्व. अनंतराव बैकर बहुउद्देशीय संकुलातील प्राथमिक शाळा, ग्रुप ग्रामपंचायत कार्यालय, ज्ञानदीप सार्वजनिक वाचनालय, अंगणवाडी, महिला उद्योग प्रशिक्षण केंद्र, व्यायामशाळा, वॉटर एटीएम या सर्व आस्थापनांना तसेच कांबळेलावगण येथील प्राथमिक शाळा, अंगणवाडी वॉटर एटीएम, बोअरवेल यांना सौरऊर्जा पुरवठा सुरू झाला आहे.

या प्रकल्पाकरिता हेरिटेज कल्चर आर्ट अँड एज्युकेशन डेव्हलपमेंट सोसायटी लांजा ही संस्था समन्वय संस्था म्हणून काम करीत आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button