
लोटे औद्योगिक वसाहतीतील कोजन प्लांट येथे पाय घसरून पडल्याने कामगाराचा मृत्यू.
लोटे औद्योगिक वसाहतीतील कोजन प्लांट येथे अश्विनी इंजिनिअरिंग इंडस्ट्रीजमध्ये कामगाराचा पाय घसरून पडल्याने मृत्यू झाला. पिंटू बबन सिंह (४३, रा. लोटे, मूळ गाव बिहार) असे त्याचे नाव आहे. शनिवारी रात्री उशिरा येथील पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ही घटना २१ जून रोजी दुपारच्या सुमारास घडल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.एक ट्रक कंपनीचे लोखंडी साहित्य घेवून थांबलेला होता. या ट्रकमध्ये काय साहित्य आहे हे पाहण्यासाठी कामगार ट्रकमध्ये चढला असता लोखंडी साहित्यावरून पाय घसरून तो खाली पडला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याला खाजगी रूग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर कळंबणी उपजिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकार्यांनी त्याची तपासणी केली असता त्याला मृत घोषित केले.www.konkantoday.com




