
दापोलीच्या कर्दे व मुरूड समुद्रकिनार्यावर समुद्रातून वाहून आले संशयास्पद पुठ्ठ्याचे रोल.
दापोलीच्या कर्दे व मुरूड समुद्रकिनार्यावर समुद्रातून पुठ्ट्याचे संशयास्पद रोल वाहून आल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. यामुळे काही वेळ प्रशासनाची धावपळ उडाली.दापोलीच्या कर्दे व मुरूड येथील समुद्रकिनारी अनेक पुठ्ठ्यांचे मोठे रोल वाहून आलेले रविवारी सकाळी ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. पुठ्ठ्यांच्या वेष्टनात यामध्ये काय आहे, हे स्पष्ट होत नसल्याने ग्रामस्थांनी ही घटना तत्काळ पोलिसांना कळवली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत ही गोलाकार वस्तू काय आहे याची पाहणी केली असता हे पुठ्ठ्याचे रोल असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. मात्र एवढे मोठे पुठ्ठ्याचे रोल समुद्रामध्ये कुठून वाहून आले याबाबत काही माहिती उपलब्ध होवू शकली नाही.www.konkantoday.com