
जयगड येथील समुद्रात नांगर टाकलेल्या जहाजावरील फिलिपाईन्स येथील अभियंत्याचा आकस्मिक मृत्यू.
जयगड येथील जे.एस.डब्ल्यू पोर्टजवळ समुद्रात नांगर टाकलेल्या एम.व्ही. डाली या जहाजावर फिलिपाईनच्या इंजिनिअरचा मृत्यू झाला. ही घटना २० जून रोजी उशिरा घडली. एलमीर अल्कारेज मोलीना (५१, रा. आरगांव सेबु, फिलिपिन्स) असे मृत्यू झालेल्या अभियंत्याचे नाव आहे. या घटनेची नोंद जयगड पोलिसांत करण्यात आली आहे.इजिप्तमधून कोळसा घेवून आलेले एम.व्ही. डाली हे जहाज जे.एस.डब्ल्यू पोर्टपासून सुमारे ५ नॉकिटल मैल समुद्रात नांगर टाकून उभे होते. गुरूवारी रात्री ४ वाजून २० मिनिटांनी जहाजावरील सेकंड इंजिनिअर एलमीर ×अल्कारेज मोलीना (५१, रा. आरगांव सेबु, फिलिपिन्स) हे जेवण करून आपल्या केबिनमध्ये गेले होते. त्यानंतर ते परत न आल्याने इतर मेंबर्सनी त्यांची पाहणी केली. मोलीना हे त्यांच्या केबिनमध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळले. क्रू मेंबर्सनी तातडीने त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले परंतु ते शुद्धीवर आले नाहीत. त्यानंतर त्यांना जे. एस. डब्ल्यू. पोर्टच्या जेटीवर आणण्यात आले. येथे खंडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांनी टगमध्येच त्यांची तपासणी केली असता मोलीना यांना मृत घोषित करण्यात आले.www.konkantoday.com