
काळी विद्या करून तुम्ही आणि तुमचे कुटुंब दमले – काळ्या विद्ये वरून रामदास कदम यांचा आमदार भास्कर जाधव यांच्यावर पलटवार
शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी यांनी त्यांच्या विरोधकांवर हल्लबोल केला. त्यामुळे रत्नागिरी जिल्हयातील राजकीय वातावरण तापले आहे. 2009 साली झालेल्या निवडणुकीत त्यांच्या विरोधकांने विजयासाठी अघोरी पूजा केल्याचा दावा भास्कर जाधव यांनी केला होता. या त्यांच्या वक्तव्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते व माजी मंत्री रामदास कदम यांनी जोरदार पलटवार केला आहेजाधव यांच्या या वक्तव्यानंतर आता रामदास कदम चांगलेच आक्रमक झाले आहेत, त्यांनी जाधव यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. भास्कर जाधव जे बोलले तेवढी त्यांची औकात नाही, एवढा मोठा माणूस तो नाही. 1995 आणि 2000 मध्ये मीच बाळासाहेब ठाकरे यांना सांगून त्यांना तिकीट द्यायला सांगितले होते. त्यानंतर बाळासाहेबांनी उमेदवारी दिली होती. त्यानंतर तो निवडून आला होता, असे कदम म्हणाले.भास्कर जाधव यांचा नौटंकी करण्यात कोणी हात पकडू शकत नाही. काळी विद्या करून तुम्ही आणि तुमचे कुटुंब दमले आहे, भास्कर जाधव हे खोटारडे आहेत. एखाद्या व्यक्तीला बदनाम कसे करायचं हे भास्कर जाधव यांच्याकडू शिकावे अशा शब्दांत त्यानी टीका केलीएकनाथ शिंदे 40 आमदार घेऊन सुरतला गेले होते. तेव्हा भास्कर जाधव हे पण सुरतपर्यंत आले होते. त्यावेळी सुरतच्या बॉर्डरपर्यंत जावून आले. पण एकनाथ शिंदे यांनी त्यांना सांगितले होते तुम्ही येवू नका. भास्कर जाधव नौटंकी करत आहेत. उद्धव ठाकरेंकडे येऊन चूक केली असे ते म्हणतात, असेही कदम म्हणाले.गुहागरची जनता आता भास्कर जाधव यांना संन्यास देणार आहे, ते फक्त 1200 मतांनी निवडून आलेले आहेत, अशी टीका कदम यांनी केली. दरम्यान कदम यांच्या या आरोपांनंतर आता आरोप- प्रत्यारोपाचे राजकारण रंगणार आहे. त्यामुळे आता येत्या काळात कदम यांच्या टीकेला जाधव काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




