
चिपळूण शहरालगतच्या वालोपेत नळपाणी योजनेचे पाईप जळून खाक; लाखोंचे नुकसान.
चिपळूण शहरालगतच्या वालोपे गावी महामार्गालगत असणार्या जागेत ठेकेदाराकडून ठेवण्यात आलेल्या नळपाणी योजनेच्या प्लास्टिक पाईपला डोंगरभागातून अचानक आलेल्या वणव्यामुळे भीषण आग लागली. आगीचे लोळ व धूर आकाशात दूरवर पसरले. चिपळूण नगर पालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी ग्रामस्थांच्या मदतीने आगीवर नियंत्रण आणले.
मात्र सुमारे १०० ते १५० पाईप यो आगीत जळून खाक झाले असून लाखोंचे नुकसान झाले आहे. वालोपे गणेशवाडी येथे महामार्गालगत असणार्या जागेत एको ठेकेदाराने मागील एका वर्षापासून मोठ्या प्रमाणात नळपाणी योजनेचे प्लास्टिक पाईप ठेवले असून अद्याप या ठेकेदाराने पाईपलाईन तसेच पडून आहेत. बसविण्याचे काम सुरु केले नाही. वर्षभरापासून हे पाईप या जागेत तसेच पडून आहेत.www.konkantoday.com