मला मंत्रिपद का मिळायला नको, हे मला कोणी सांगायला हवं,ठाकरे गटातील नेते आमदार भास्कर जाधव


ठाकरे गटातील नेते तथा आमदार भास्कर जाधव यांनी निवृत्तीचे संकेत दिले आहेत. तसेच त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत डावललं जात असल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली. क्षमतेप्रमाणे संधी दिली जात नसल्याचंही त्यांनी म्हटलंय.शरद पवार यांची साथ सोडली हे मला कधीतरी चुकीचं वाटतं, असं ते म्हणाले होते. त्यांच्या या विधानानंतर ठाकरे गटाचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनी भास्कर जाधवांनी त्यांची खंत मांडली आहे, आता पक्षप्रमुख त्याची दखल घेतील. आम्ही त्यांना भाषण करायची संधी देतो, असं त्यांनी म्हटलंय. आता राऊतांच्या याच विधानाचा समाचार भास्कर जाधव यांनी घेतलाय.शरद पवार यांची साथ सोडली, त्यामुळे मला काहीतरी चुकल्यासारखं वाटतंय, असं अजिबात नाही. तसं स्पष्टीकरण मी दिलेलं आहे. मी शरद पवार यांना सोडल्याचा निर्णय चुकीचा होता, हे मी स्पष्टपणे बोललो. पण मला त्याची खंत वाटतंय असं अजिबात नाही. मला मंत्रिपद मिळायला पाहिजे होतं, मी तेव्हा बोललो. मी आजही बोलेन. उद्याही बोलेन. मला मंत्रिपद का मिळायला नको, हे मला कोणी सांगायला हवं. मला मंत्रिपद मिळालं नाही म्हणून काय रडत बसायचा का? उलटं लढायचं. मला मंत्रिपद मिळालं नाही म्हणून मी जे फुटून गेले त्यांच्याबरोबरही मी गेलो नाही. मी लढत आहे, अशी खदखद भास्कर जाधव यांनी व्यक्त केली.तसेच, संजय राऊत हे माझे वरिष्ठ नेते आहेत. माझ्या पाठीमागे ते खंबीरपणे उभे राहतात. आपल्या नेत्याने एखादे विधान केले असेल तर आपण त्याबद्दल प्रतिक्रिया द्यायची नसते. परंतु अशा पद्धतीने ते वरचेवर मला सावरण्याची भाषा करतात. पण मला वाटतं की मला भान आहे. पक्ष मला भाषण करायला देतो की नाही हे मला चांगलं कळतं. माझं भाषण झाल्यानंतर संजय राऊत यांचं भाषण झालं. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी भाषण केलं. त्यामुळे पक्ष मला भाषण करायला देत नाही म्हणून हे बोलतोय, असा त्यांच्या बोलण्यातून जो संदेश जातोय हे चुकीचं आहे, असं स्पष्टीकरण भास्कर जाधवांनी दिलं.तसेच, बाळासाहेबांच्या अष्टप्रधान मंडळात असणारे नेते सुभाष देसाई हे व्यासपीठावर असतात. दिवाकर रावते हेही व्यासपीठावर असतात. तरीही पक्ष मला भाषण करण्याची संधी देतो. त्याच्याही उपर आदित्य ठाकरे व्यासपीठावर असतात तरीही मला भाषणाची संधी दिली जाते. माझ्या डोक्यात हवा गेलेली नाही. मला भाषण करायला मिळालंच पाहिजे. मी भाषण करणारा मोठ माणूस आहे, हे माझ्या डोक्यात नाही एवढंच मला सांगायचं आहे, असा घरचा आहेर, भास्कर जाधवांनी दिला.Bhaskar Jadhav Shivsena uddhavthakare

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button