
दापोली तालुक्यातील पाडले येथे ब्रेक निकामी झाल्याने रोडरोलर थेट समुद्रात.
दापोली तालुक्यातील पाडले येथे डोंगर उताराच्या रस्त्याने येत असताना रोडरोलरचे ब्रेक निकामी झाल्याने रोलर थेट समुद्रकिनारी कोसळला. यावेळी प्रसंगावधान राखत चालकाने उडी मारून स्वतःचा जीव वाचवला. यावेळी रात्र असल्याने रस्त्यावर रहदारी नसल्याने मोठा अनर्थ टळला. पाडले येथे एका खाजगी गृहनिर्माण संस्थेच्या जागेत रूंदीकरणाचे काम सुरू आहे.
येथे काम संपवून रात्री १० च्या सुमारास हा रोडरोलर उतार रसत्यावरुन येत होता. मात्र अचानक रोडरोलरचे ब्रेक निकामी झाल्याने रोडरोलर थेट समुद्रकिनार्यावर कोसळला. मात्र चालकाने प्रसंगावधान दाखवत बाहेर उडी मारून आपला जीव वाचवला. त्यामुळे कोणतीही मनुष्यहानी झालेली नसल्याचे समोर आले.www.konkantoday.com