
कुवारबाव ज्येष्ठ नागरिक संघाचा 28 जून रोजी मासिक स्नेह मेळावा
*रत्नागिरी :* कुवारबाव परिसर ज्येष्ठ नागरिक संघाचा मासिक स्नेह मेळावा शनिवार दिनांक 28 जून 2025 रोजी सायंकाळी ४ वाजता ज्येष्ठ नागरिक भवनात संपन्न होणार आहे. यावेळी जून महिन्यात वाढदिवस असलेल्या ज्येष्ठांचे सत्कार करण्यात येतील. तसेच आगामी काळातील निवडक दिनविशेष साजरे करण्यासंबंधी विचारविनिमय करण्यात येईल. नवीन उपक्रम आयोजित करण्यासंबंधी सदस्यांच्या सूचना जाणून घेण्यात येतील. तरी सभासदांनी या मेळाव्याला बहुसंख्येने उपस्थित राहून सहकार्य करावे, असे आवाहन संघाचे अध्यक्ष श्री. मारुती अंबरे आणि उपाध्यक्ष श्री. राजेंद्र कदम यांनी केले आहे.