
स्वमालकीची इमारत नसल्याने वनविभागाचे पिंजरे सडताहेत पावसात.
वनविभागाला स्वमालकीची इमारत नसल्याने मोठी गैरसोय होत आहे. जागेअभावी हजारो रुपये खर्चून तयार केलेले पिंजरे पावसाचा सामना करत आहेत. याकडे अधिकारी वर्गाने लक्ष देवून हे पिंजरे सुरति स्थळी ठेवणे गरजेचे आहे.जंगल तसेच प्राण्यांचे संरक्षण करण्याची जबाबदारी वनविभागाची आहे. वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी यासाठी मेहनत घेत असतात. मात्र या अधिकारी कर्मचार्यांना बसण्यासाठी स्व-मालकीची इमारत नाही. देवरूखमध्ये सुद्धा असेच चित्र पहायला मिळत आहे. साडवली सह्याद्रीनगर येथे अधिकारी, कर्मचारी आपल्या खिशाला चाट देवून प्रतिमहा हजारो रुपयांचे भाडे भरत कारभार हाकत आहे.वन्यप्राणी बिबट्या सध्या मानवी वस्तीत घुसत आहेत. भक्ष्याचा पाठलाग करताना विहिरीमध्ये पडत आहेत. त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी पिंजरे बनविण्यात आले आहेत. ग्रामस्थांना वानरांचा उपद्रव सहन करावा लागत आहे. त्यांना पकडण्यासाठी पिंजरे बनविण्यात आले आहेत. देवरूख येथे भाड्याची असलेली इमारत वस्तूंच्या तुलनेत अपुरी पडत आहेत. परिणामी पिंजरे भर पावसात बाहेर ठेवण्याची वेळ वनविभागावर आली आहे.www.konkantoday.com.