
रत्नागिरी जिल्ह्यात वृक्षलागवडीचे होणार जिओ टॅगिंग.
राज्यातील वनाच्छनाची टक्केवारी वाढवण्यासाठी हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र या अभियानांतर्गत यावर्षी राज्यात १० कोटी वृक्षलागवड करण्यात येणार आहे. जिल्ह्यालाही यावर्षी विविध विभागांना वृक्षलागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. रत्नागिरी सामाजिक वनीकरण विभागाला १ लाखांचे उद्दिष्ट आहे. पण आता लागवड होणार्या या वृक्षलागवडीचे जिओ टॅगिंग करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रामाणिकपणे प्रत्येक रोपांची लागवडीची नोंद करण्यात येणार आहे.राज्यातील वनक्षेत्र वाढविण्यासाठी हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र मोहिमेंतर्गत यावर्षी १० कोटी झाडे लावण्यात येतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आहे. त्यानुसार जिल्ह्यातही नियोजन सुरू आहे. वृक्षारोपण ही लोकचळवळ होवून ही मोहीम यशस्वी होईल. त्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.www.konkantoday.com
 




