लांजा तालुक्यातील केळंबे येथे भावोजीच्या ऐवजावर मेहुण्याचा डल्ला.

लांजा तालुक्यातील केळंबे येथील नामदेवनगर परिसरात चोरीची घटना समोर आली आहे. फिर्यादी युवराज गणपती जाधव यांचे सख्खे मेहुणे राज नारायण राठोड (२४) यानीच घरातून सोन्याची अंगठी, मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा एकूण ३ लाख ३६ हजार १५० रुपयांचा ऐवज चोरून पोबारा केला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.अधिक माहितीनुसार ही घटना दि. ४ एप्रिल रोजी रात्री ९ वाजल्यापासून दि. ५ एप्रिल रोजी सायंकाळी ५.३० वाजेदरम्यान घडली. फिर्यादी युवराज जाधव हे बेळगाव येथे गेले असताना, त्यांच्या गैरहजेरीचा फायदा घेत आरोपी राज राठोड याने त्यांच्या केळंबे घर नं. ७६४, अमृतसृष्टी नामदेवनगर येथील घरातून चोरी केली.चोरलेल्या ऐवजांमध्ये ४१,१५० रुपये किंमतीची अंदाजे अर्धा तोळा वजनाची तीन पिळांची सोन्याची अंगठी, १५,००० रुपये किंमतीचा विवो गंपनीचा व्ही ३० मॉडेलचा ५ जी मोबाईल फोन, आणि २,८०,००० रुपये रोख रक्कम यांचा समावेश आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button