
रत्नागिरी, रायगडमधील ५३ नाच-तमाशा मंडळांचा सन्मान.
रायगड व रत्नागिरी जिल्ह्यातील कलगी तुरा सांस्कृतिक शाहिरी कला मंडळाच्यावतीने तमाशा व लगौरी गणेश जाखडी नाच ही लोककला जतन करून तिचे रंगमंचावर सादरीकरण करणार्या दोन्ही जिल्ह्यातील एकूण ५३ कला मंडळाचा सन्मान करण्यात आला. भिंगळोली येथील श्रीकृष्ण सभागृहात हा सोहळा रंगला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष राम टेंबे होते.
कलगी तुरा मंडळाच्यावतीने कलाकारांना प्रोत्साहन देत ही लोककला वृद्धींगत करण्याच्या उद्देशाने वर्षभरात कार्यक्रम सादर करणार्या मंडळाना सन्मानित करण्यात येते. सन २०२४-२५ या वर्षामध्ये रायगड, रत्नागिरी जिल्ह्यातील सोळा तमाशा मंडळांनी चैत्र महिन्यातील देवदेवतांच्या जत्रोत्सवात डबलबारी तमाशा सादर केले. तसेच जाखडी नृत्य स्पर्धा व डबलबारी कलगी तुरा कार्यक्रमातून २५ लाख तरूण नाच मंडळांनी व १२ चाळीस वर्षावरील नाच मंडळांनी आपली कला सादर केली. या सर्व कलामंडळांना सन्मानपत्र, सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र देवून गौरविण्यात आले.www.konkantoday.com




