पालकमंत्र्यांच्या आदेशाप्रमाणे लोटेतील ९० रासायनिक कारखान्यात मॉकड्रील.

खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीत रासायनिक व धोकादायक कारखान्यांमध्ये सुरक्षेच्यादृष्टीने रंगीत तालीम म्हणजे मॉकड्रीलचे आयोजन करण्याबाबत उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी केलेल्या सुचनेनुसार औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचनालय विभागाने कार्यवाही करताना ९० कारखान्यांमध्ये उपक्रम राबवला.मान्सूनपूर्व आपत्कालीन तयारी व कारखान्यांची सुरक्षितता या संदर्भात झालेल्या बैठकीत पालकमंत्री सामंत यांनी याबाबच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय, कोल्हापूर विभाग व रत्नागिरी कार्यालय लोटे परशुराम इंडस्ट्रीयल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात आला.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button