
काळबादेवीतील महामार्ग समुद्रकिनार्यावरून न्यावा या मागणीसाठी ग्रामस्थ एकनाथ शिंदेंची भेट घेणार.
महत्वाकांक्षी रेवस रेड्डी सागरी महामार्गाच्या रचनेत काळबादेवी तालुका रत्नागिरी परिसरात आम्हाला बदल अपेक्षित आहे. हा मार्ग समुद्रकिनार्याजवळून गेल्यास गावातील पर्यटन उद्योग भरभराटीला येईल ही बाब लक्षात आणून देण्यासाठी आम्ही महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपाध्यक्ष माधुरी मिसाळ, पालकमंत्री उदय सामंत यांची भेट घेणार आहोत, अशी माहिती तेथील सरपंच तृप्ती पाटील यांनी दिली.त्या म्हणाल्या, राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी रेवस रेड्डी सागरी महामार्गाचे काम हाती घेण्यात आले आहे.
यात मिर्या-काळबादेवी खाडीवरील पूल प्रस्तावित आहे. या पुलाला जोडून फ्लायओव्हर प्रस्तावित करण्यात आला आहे. हा फ्लायओव्हर बसणी-साखरतर रस्त्याला जोडण्यासाठी प्रस्तावित आहे. या फ्लायओव्हरऐवजी मिर्या-काळबादेवी पुलाला लागून समुद्रागलत आरे गावापर्यंत रस्ता प्रस्तावित करावा, अशी मागणी काळबादेवी ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेने २० ऑगस्ट रोजी केली. त्यानंतर आम्ही खासदार नारायण राणे यांना एक पत्र लिहिले आहे.www.konkantoday.com