
२२०० कोटींचा पूर नियंत्रण पूर्व प्राथमिक आराखडा नागरिकांसाठी खुला करा -आमदार शेखर निकम.
पूरमुक्त चिपळूणसाठी २२०० कोटींचा पूर नियंत्रण पूर्व प्रामिक जलसंपदा विभागाने तयार केला आहे. तो आराखडा नेमका कसा आहे. त्यामध्ये काय समाविष्ठ आहे. अजून काय करता येईल याबाबत जनतेने लेखी स्वरूपातील सूचना दिल्यास त्यावर चर्चा करून योग्य ती दुरूस्ती केली जाणार आहे. यासाठी लवकरात लवकर तो आराखडा जनतेसाठी खुला करावा, अशा सूचना आमदार शेखर निकम यांनी जलसंपदा विभागाला केली आहे.www.konkantoday.com