ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन


मराठी मनोरंजनसृ्ष्टीतून दु:खद बातमी आली आहे. ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन झालं आहे. लेखक, संगीत दिग्दर्शक अशीही त्यांची ओळख होती. अनेक वर्षांपासून ते इंडस्ट्रीत काम करत होते.विवेक लागू यांचा जन्म पुण्यात झाला. त्यांना लेखन आणि दिग्दर्शनाची आवड होती. हीच आवड त्यांना मुंबईत घेऊन आली. त्यांनी रंगभूमीवरुन करिअरला सुरुवात केली. सुरुवातीला ते लेखन, दिग्दर्शन करायचे. काही नाटकांसाठी त्यांना पुरस्कारही मिळाला. शिवाय संगीतातही त्यांची रुची होती. मात्र अपघातानेच ते अभिनयाकडे वळले. विजय मेहता यांच्या शिबिरात येण्याची त्यांना संधी मिळाली होती. मात्र त्या शिबिरात केवळ अभिनयाचेच धडे देणार होत्या. मुंबईत १ महिना फुकट राहता येणार होतं म्हणून त्यांनी शिबीर जॉइन केलं आणि अभिनय शिकले. दिग्दर्शनाची आवड असूनही त्यांनी अभिनयही चांगला केला. इतकंच नाही तर अभिनयातही त्यांनी पुरस्कार मिळवले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button