
ऑगर ड्रिलिंग मशीन पुन्हा कार्यरत; बोगद्यातील ४१ कामगार लवकरच बाहेर
उत्तरकाशीतील सिल्क्यारा बोगद्यात अडकलेल्या ४१ कामगारांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्याला वेग आला आहे. कामगारांना बाहेर काढण्याची मोहीम शेवटच्या टप्प्यात असून, लवकरच हे कामगार सुखरूप बाहेर येतील. अशी आशा असल्याचे उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.
पुढे बोलताना मुख्यमंत्री धामी म्हणाले, पीएम मोदी बचावकार्यात येणाऱ्या अडचणींबद्दल सर्व अपडेट्स घेत आहेत. तसेच उपायांवर अधिकाऱ्यांशी चर्चाही करत आहेत. दरम्यान या मोहिमेत केंद्र आणि राज्य सरकारच्या सर्व एजन्सी युद्धपातळीवर कार्यरत आहेत. ४१ कामगारांच्या बचाव कार्यासाठी एकत्र काम करत आहोत. आम्हाला आशा आहे की, हे ऑपरेशन लवकरच पूर्ण होईल आणि सर्व कामगार लवकरच बाहेर येतील, असेही धामी म्हणाले.
www.konkantoday.com