
आम्ही अघोरी विद्या करून मोठे झालो असतो तर याआधी अशा विद्या करून कधीच पालकमंत्री झालो असतो- भरत गोगावले
शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि राज्यमंत्री भरत गोगावले सध्या अघोरी पूजेच्या व्हिडिओमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत . पालघरचे पालकमंत्री होण्यासाठी आघोरी पूजा केल्याचा दावा केला जात असताना महायुतीतीलच अजित पवारांच्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रवक्ते सुरज चव्हाण यांनी शेअर केलेल्या सोशल मीडियावरील व्हिडिओवरून निवडणुकीपूर्वी भरत गोगावल्यांनी घरी आघोरी पूजा करून घेतली असा दावा करण्यात आला आहे .यावर राज्यमंत्री भरत गोगावले यांनी प्रतिक्रिया दिली आहे .अघोरी विद्येला आम्ही मानत नाही .जे नशिबात होतं तेच होतं .त्यामुळे आम्ही अघोरी विद्या करून मोठे झालो असतो तर याआधी अशा विद्या करून कधीच पालकमंत्री झालो असतो .माझ्या घरी आलेले साधू महाराज आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी येत असतात .मी लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमीच सर्वांचा आशीर्वाद घेत असतो .आम्हाला खरोखर अघोरी विद्या करायची असती तर असे व्हिडिओ काढून टाकले नसते .आम्ही हिंदुत्व आणि देवधर्म करणारे आहोत .ज्यांना माझे हे प्रकार अघोरी वाटतात त्यांना वाटू द्या .आम्ही असलं अघोरी काही करत नाही .पालकमंत्री पदासाठी वेठीस धरण्यासाठी राष्ट्रवादीचा हा डाव’ असल्याचंही मंत्री भरत गोगावले यांनी म्हटलं.