
मूळ सोमनाथ ज्योतिर्लिंग पवित्र दर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन
दि आर्टऑफ लिव्हिंग तर्फे महाराष्ट्रात सोमनाथ ज्योतिर्लिंग दर्शन यात्रा रत्न नगरीत दाखल.
शेकडो भाविकांनी घेतले दर्शन
काल संध्याकाळी अंबर हॉल मध्ये
रत्नागिरी मधील जनतेला मूळ सोमनाथ ज्योतिर्लिंग पवित्र दर्शनाचा लाभ घेतला
आज गुरुवार दिनाक १९ जून २०२५
रोजी दर्शन सोहळा वेळ – सायंकाळी ६.०० ते ८.३० वाजेपर्यंत स्थळ : मराठा मंडळ हॉल,जिल्हा परिषद जवळ, माळनाका,रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आला आहे.
अकराव्या शतकात मोहम्मद गजनी याने सोमनाथ मंदिरावर
चढाई करून पवित्र शिवलिंगाचे तुकडे केले. त्यावेळी त्याचे काही अवशेष अग्निहोत्री यांनी जपून ठेवून त्याला शिवलिंगाचा आकार देऊन पूजा केली. आणि हे अवशेष गुप्त ठिकाणी सुरक्षित ठेवले.
1924 साली कांचीचे परमचार्य यांनी सांगितले की 100 वर्षांनी बंगलोर मध्ये स्थित संत येतील त्यांना ते नेऊन द्या.आणि हे शिवलिंग गुरुदेव श्री.श्री. रविशंकरजी यांच्याकडे बंगलोर आश्रम मध्ये सुपूर्त करण्यात आले.
या यात्रेद्वारे मूळ सोमनाथ ज्योतिर्लिंगाचे अवशेष जनतेसमोर आणले जातील जे भारताच्या संस्कृतीचा आणि आध्यात्मिक वारशाचा अमूल्य भाग आहेत.
या सोमनाथ ज्योतिर्लिंगाचे पवित्र अवशेषांचे सर्व समाजाला दर्शन मिळावे हा उद्देश ठेवून गुरुदेव त्यांचे अनुयायी भारतातील सर्व भागांमध्ये पाठवत आहेत.
आपले भाग्य की, आपल्या रत्नागिरी जिल्ह्यात रत्नागिरी शहरात हे ज्योतिर्लिंग आले आहे. तरी आपण सर्वांनी दर्शनाचा लाभ घ्यावा.*
या कार्यक्रमासाठी मुख्य आयोजक ऑड. सौ. जया उदय सामंत,धर्मसिहं भाई चौहान, विनिता गोखले,निलेश मिरजकर, भावना महागावकर, राजेश भुर्के, प्रमोद खेडेकर,प्रवीण लाड हे उपस्थित राहत आहेत. रत्नागिरी येथील जास्तीत जास्त नागरिकांनी आज संध्याकाळी दर्शनचा लाभ घ्यावा.
असे आवाहन वेदिक धर्म संस्थान व दि आर्ट ऑफ लिव्हिंग रत्नागिरी तर्फे करण्यात येत आहे.




