निलेश राणेंनी पदाधिकाऱ्याला धमकावलं, बंधू नितेश राणेंचा गंभीर आरोप


मागील काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात राणे बंधूंचे शीतयुद्ध रंगले आहे. दरम्यान आता याच युद्धाचा एक नवीन अंक समोर आलाय.

तर आमदार निलेश राणे यांनी पक्षातील पदाधिकाऱ्यांना धमकावलं, असा आरोप मंत्री नितेश राणे यांनी केलाय. त्यांनी एक्स अकाउंटवर पोस्ट करत निलेश राणेंना युती धर्माची आठवण करून दिली आहे. तर दोन्ही बंधूमध्ये सोशल मिडिया पोस्ट वॉर रंगल्याचं पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी अशीच कानउघडणी निलेश राणे यांनी नितेश राणे यांची केली होती.मंत्री नितेश राणे यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत आमदार निलेश राणे यांना युती धर्माची आठवण करून दिलीय. नितेश राणे यांनी एका कार्यकर्त्याचा व्हॉट्सॲप चॅटचा स्क्रीनशॉट शेअर केलाय. यासोबतच कॅप्शन देत त्यांनी महायुतीतील कार्यकर्त्यांना धमकावणे अयोग्य आहे, असं मत व्यक्त केलंय.
आदरणीय निलेशजी, आपणच काही दिवस अगोदर महायुती बदल बोलला होता. आता असे आपल्याच मित्र पक्षाचा पदाधिकारीला धमकवणे बरोबर नाही. शेवटी आपण महायुतीचे घटक आहोत. आपण नोंद घ्याल अशी अपेक्षा करतो, असं X पोस्टमध्ये नितेश राणे यांनी म्हटलं आहे. तर त्यांनी आपल्या थोरल्या बंधूलाच उपदेशाचा डोस दिल्याचं दिसत आहे.काही दिवसांपूर्वी मंत्री नितेश राणे यांनी पक्षाच्या मेळाव्यात बोलताना ‘कोणी कितीही ताकद दाखवली, कोणी कसेही नाचले, तरी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीच राहतील आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच असतील. लक्षात ठेवा, मुख्यमंत्रीपदावर बसलेला नेता भाजपचाच आहे,’ असं वक्तव्य केलं होतं. नितेश राणे यांचे बंधू निलेश राणे यांनी त्यांना उद्देशून एक सल्ला देणारी पोस्ट केली होती. यानंतर दोन्ही भावांमध्ये जुंपल्याचे पाहायला मिळतंय.नितेशने जपून बोलावे. सगळ्या गोष्टींचं भान ठेवून बोललं पाहिजे. सभेत बोलणं सोपं आहे. पण आपल्या बोलण्यामुळे आपण नेमकं कोणाचा फायदा करतोय, याचं भान असलं पाहिजे. आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरून चालणार नाही, असा सल्ला नितेश राणेंना त्यांनी दिला होता

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button