जनसंचय आणि धनसंचय जोडत मार्गस्त असलेल्या स्वरूपानंद पतसंस्थेचा प्रसार “स्वरूप सहकार’ मुखपत्रा माध्यमातून महाराष्ट्रभर होवो – आ.रविंद्र चव्हाण


स्वामी स्वरूपानंद पतसंस्था दिर्घकाळ सातत्याने वर्धिष्णू व्यवहार करत आली आहे. विश्वासार्ह स्थान असलेली ही विशाल संस्था नाविन्यपूर्ण उपक्रम व विविध योजना राबवत असते. या सर्वाचा प्रचार आणि प्रसार व्हावा या उद्देशाने “स्वरूप सहकार” हे मासिक प्रकाशित करण्याचा संस्थेचा निर्णय संस्थेची प्रतिमा संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचवण्याच काम प्रभावी पद्धतीने करेल असे प्रशंसोद्गार आ.रविंद्र चव्हाण यांनी स्वरूप सहकार मासिकाच्या प्रकाशन समयी काढले.
आज स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेत आयोजित कार्यक्रमात आ.रविंद्र चव्हाण कार्याध्यक्ष भा.ज.पा महाराष्ट्र यांच्या शुभहस्ते “स्वरूप सहकार” मासिकाचे विमोचन करण्यात आले. त्याप्रसंगी आ.रविंद्र चव्हाण यांचा संस्थेचे अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी गणेश प्रतिमा देऊन सत्कार केला. संस्थेची माहिती देताना संस्थेचा २० जून ते २० जुलै ठेव वृद्धी मासाचा प्रारंभ होत आहे. आजपर्यंत ३५० कोटींच्या ठेवी संस्थेत जमा झाल्या आहेत. या ठेव वृद्धी मासात मोठ्या प्रमाणावर ठेव संकलन होईल. असा विश्वास संस्था अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी व्यक्त केला.
स्वरूपानंदच्या ठेव वृद्धी मासात आकर्षक ठेव दरांच्या योजना स्वरूपांजली ठेव योजना १२ ते १८ महिने सर्वसाधारण ८.५०% व ज्येष्ठ नागरिक व महिला ९% सोहम ठेव योजना १९ ते ३६ महिने (मासिक व्याज) ८.२५% व ज्येष्ठ नागरिक व महिला ८.५०% याप्रमाणे योजना ठेव वृद्धी मासात गुंतवणूकदारांसाठी घोषित केल्या असून या योजनांचे माध्यमातून मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक ठेवीदारांनी करावी व संस्थेच्या विश्वासार्ह, सुरक्षित व आकर्षक ठेव योजनांचा लाभ निश्चिंतपणे घ्यावा असे आव्हान ॲड. दीपक पटवर्धन यांनी केले.
“स्वरूप सहकार” मासिकाच्या प्रकाशनाचे समारंभास उपाध्यक्ष श्री.माधव गोगटे, संचालक श्री.प्रसाद जोशी, चार्टड अकौन्टट श्री.शैलेश काळे, श्री.अल्हाद मयेकर, श्री.राजन होतेकर, श्री.सुमुख घाणेकर, डॉ.डिंगणकर, श्री.गौरंग आगाशे, श्री.मंगेश गांधी, श्री.प्रवीण लाड, श्री.विनीत भट, श्री.अशोक शेटेये, श्री.आनंद लिमये, श्री.रुपेश साळवी, श्री.नितीन देवरुखकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button