
गुणरत्न सदावर्ते यांच्या सत्तेला सुरुंग एसटी बँकेचे आता १२ संचालकांच्या सेना प्रवेशाने भाजप आणि सेनेमध्ये पुन्हा धुसफूस होण्याची शक्यता
स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह बॅंकेचे (ST Bank) 12 संचालक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या गळाला लागले आहेत. वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या पॅनलमधील18 संचालकांपैकी 12 संचालक एकनाथ शिंदे यांच्या सेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे.त्यामुळे सदावर्ते यांच्या सत्तेला सुरुंग लागला आहे.गुणरत्न सदावर्ते यांचा मेहुणा सौरभ पाटीलविरोधातला आक्रोश आणि शिवसेना नेते आनंद अडसूळ यांच्या डावपेचामुळे बॅंकेच 12 संचालक गुणरत्न सदावर्ते यांची साथ सोडून शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. या संचालकांनी मंगळवारी रात्री मंत्री उदय सामंत यांची मुंबईत भेट घेतली. त्यानंतर पक्षप्रवेशावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत सदावर्ते यांच्या पॅनलचे 12 संचालक शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे गुणरत्न सदावर्ते हा मोठा धक्का मानला जात आहे. स्टेट ट्रान्सपोर्ट को ऑपरेटिव्ह बॅंकेची जवळपास 4200 कोटी रुपयांची उलाढाल आहे. तसेच2 हजार कोटींच्या ठेवीदेखील बॅंकेत आहेत. एकूण 63 हजार सभासद असलेली ही बॅक एनपीए शून्य आहे.दरम्यान, सदावर्ते यांच्या पॅनलमधून या 12 संचालकांच्या हकालपट्टीचा ठराव मंजूर करण्यात आला असून सदावर्ते यांचा मेहुणा सौरभ पाटील यांच्या मनमानी कारभाराला संचालक वैतागले होते. गुणरत्न सदावर्ते हे देवेंद्र फडणवीस यांच्या निकटचे मानले जातात. आता १२ संचालकांच्या सेना प्रवेशाने भाजप आणि सेनेमध्ये पुन्हा धुसफूस होण्याची शक्यता आहे.