
खेड बाजारपेठ मध्ये जगबुडी नदी चे पाणी भरण्यास सुरुवात,एन. डी.आर.एफ. टीम दाखल होणार
रत्नागिरी जिल्ह्यातील खेड परिसरात मुसळधार पाऊस कोसळत असून त्यामुळे जगबुडी नदीच्या पात्रात पाण्याची पातळीत वाढ झाली असून खेड बाजारपेठ मध्ये जगबुडी नदी चे पाणी भरण्यास सुरुवात गांधी चौक पर्यत आले आहे
जगबुडी नदी ची पाण्याची पातळी ९.४० वर गेली आहे
खेड नगर परिषद प्रशासन अलर्ट मोड वर आहे
वडगाव, शिरगाव, तुळशी या परिसरात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत आहे त्यामुळे पाणी पातळी वाढण्याची शक्यता आहे.
खेड मध्ये लवकरच एन. डी.आर.एफ. टीम दाखल होणार असल्याची माहिती तहसीलदार सोनावणे यांनी दिली आहे